वादग्रस्त अभिनेत्री सनी लियोन आणि ‘मेनकाईन्ड’ आस्थापन यांच्या विरोधात बडोदा येथे हिंदु जनजागृती समितीकडून तक्रार प्रविष्ट

गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात ‘मेनफोर्स कन्डोम’चे विज्ञापन केल्याचे प्रकरण

अशी तक्रार का करावी लागते ? सरकार स्वत:हून कारवाई का करत नाही ?

बडोदा (गुजरात) – हिंदूंच्या पवित्र नवरात्री उत्सवाच्या काळात गुजरातमध्ये ‘नवरात्री खेळा परंतु प्रेमाने’ असे लिखाण असलेल्या आणि अभिनेत्री सनी लियोन यांचे छायाचित्र असलेल्या ‘मेनफोर्स कन्डोम’ या उत्पादनाचे मोठे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले. त्यामुळे नवरात्रीच्या पवित्र धार्मिक उत्सवात विज्ञापनाच्या नावाखाली समाजात अश्‍लीलता पसरवणार्‍या आणि हिंदूंच्या धार्मिक उत्सवातून अश्‍लिल संदेश देणार्‍या सनी लियोन आणि ‘मेनफोर्स कन्डोम’ उत्पादनाची निर्मिती करणारे ‘मेनकाईन्ड’ आस्थापन यांच्या विरोधात २५ सप्टेंबर या दिवशी येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. येथील हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा रणरागिणीच्या गुजरात समन्वयक सौ. रेखा बर्वे यांच्याकडून ही तक्रार करण्यात आली.

या तक्रारीत लियोन यांच्यावर महाराष्ट्रातील ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. तरी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा कमावतात, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आणि भरण्यात आलेला कर यांची चौकशी करावी, त्यांना भारतात कोणत्या प्रकारचा व्हिसा मिळाला आहे ? आणि त्याच्या आधारावर त्या चित्रपट आणि विज्ञापने करू शकतात का, याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF