मुंबई पोलिसांकडून श्री गणेशाचे मानवीकरण करून विडंबन

धर्मद्रोही पोलीस !

‘मुंबई पोलिसांनी त्यांच्या ‘टि्वटर अकाऊंट’वर गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात सूचना देण्यासाठी केलेल्या ट्वीटमध्ये गणपतीची २ चित्रे दाखवली आहेत. पहिल्या चित्रात साधा गणपति आहे आणि दुसर्‍या चित्रात त्याच गणपतीने दोन्ही हात कानांवर ठेवले आहेत. या संदर्भात ट्वीट केले आहे, ‘‘गोंधळाचा आवाज कुणाच्याही कानांना आनंद देऊ शकत नाही. जर एखादा ऐकतच नसेल, तर तुमच्या प्रार्थना करण्याला काय अर्थ रहाणार ?’’ तसेच या चित्रांवर लहान अक्षरात इंग्रजीत म्हटले आहे, ‘‘तुम्हाला कृपाशीर्वाद संपादन करायचा आहे कि त्याला त्रास झालेला पहायचा आहे ?’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF