दाऊद इब्राहिम हा डॉ. झाकीर नाईक यांना पैसे पुरवत होता !

दाऊद डॉ. झाकीर नाईक यांना पैसे पुरवत होता, त्या वेळी भारतीय गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या ?

मुंबई – दाऊद इब्राहिम आणि डॉ. झाकीर नाईक यांचे जवळचे संबंध आहेत. दाऊद वर्ष २०१२ पासूनच डॉ. झाकीर नाईक यांना आर्थिक साहाय्य करत होता. मुंबईतील काही उद्योगपतींच्या माध्यमातून दाऊद हा डॉ. झाकीर नाईक यांना पैसे पोचवत होता. तसेच काही खाजगी संस्थांच्या माध्यमातूनही पैसे देण्यात येत होते, अशी माहिती दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने पोलिसांच्या चौकशीत दिली. इक्बाल याला काही दिवसांपूर्वी खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

इक्बालने यापूर्वी दाऊदविषयी ही माहिती दिली आहे. दाऊद पाकमधील कराचीत रहात असून त्याची प्रकृती चांगली आहे. दाऊदची पत्नी गेल्या वर्षी मुंबईत तिच्या वडिलांना भेटण्यासाठी आली होती. दाऊदचा दुसरा भाऊ अनिस ईदच्या वेळी मुंबईतील कुटुंबियांना दूरभाष करतो, असे इक्बालने सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF