पाकमध्ये सहस्रावधी मदरशांमधून शेकडो आतंकवादी बनवले जातात ! – कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान

पाकमधील मदरशांची जशी स्थिती आहे, तशी स्थिती भारतातील काही मदरशांची आहे, हे अन्वेषण यंत्रणांनी केलेल्या अन्वेषणामधून यापूर्वीच समोर आले आहे; मात्र भारतातील कम्युनिस्ट पक्ष कधीही या संदर्भात बोलत नाहीत; कारण तसे बोलणे म्हणजे निधर्मीवादाच्या विरोधात ठरेल, असेच त्यांना वाटते ! त्यामुळे त्यांच्यापेक्षा पाकमधील कम्युनिस्ट पक्ष अधिक स्पष्टवक्ता आहे, हे लक्षात येते !

कोची (केरळ) – पाकिस्तानमध्ये सहस्रावधी मदरशांमधून ‘सौदी अरेबियाच्या इस्लामनीती’चे शेकडो आतंकवादी बनवले जात आहेत, असे विधान कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तानने (सीपीपीने) केले आहे. येथे झालेल्या कम्युनिस्ट पक्षांच्या २ दिवसीय दक्षिण आशियाई क्षेत्रीय संमेलनात सीपीपीच्या केंद्रीय समितीचे हे विधान असणारी पत्रके वाटण्यात आली. यात पुढे म्हटले आहे की, पाकमध्ये सामाजिक परंपरा तोडण्यासाठी पाक सैन्याने दीर्घकालीन धोरण राबवले आहे.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)च्या पॉलिट ब्युरोचे सदस्य एम्.ए. बेबी यांनी सांगितले की, या संमेलनामध्ये सीपीपीचे प्रतिनिधी भारताकडून व्हिसा देण्यात न आल्याने उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांची भूमिका येथे पत्रकांद्वारे सांगण्यात आली. सीपीपीची स्थापना वर्ष १९४८ मध्ये कोलकात्यामध्ये झाली होती. पाकमध्ये याचे केवळ नाममात्र अस्तित्व आहे.


Multi Language |Offline reading | PDF