श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्याची गोकाक (बेळगाव) येथे हत्या

कर्नाटकमध्ये नक्षल समर्थक गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर देशभरातील पुरो(अधो)गामी ऊर बडवू लागतात; मात्र एखाद्या हिंदुत्वनिष्ठाची हत्या झाली, तर पुरोगामी बोलत नाहीच, तसेच प्रसारमाध्यमेही बातमी देत नाहीत !

रोहित राजू पाटील

बेळगाव – बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात श्रीराम सेनेचे कार्यकर्ते रोहितराजू पाटील (वय २६ वर्षे) यांची २४ सप्टेंबरच्या रात्री अज्ञातांकडून भोसकून हत्या करण्यात आली. पाटील दुचाकीवरून जात असतांना अप्सरा चौकात त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकण्यात आली आणि नंतर त्यांना धारदार शस्त्रांनी भोसकण्यात आले. यामागे वैयक्तिक वाद असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस या हत्येचे अन्वेषण करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF