भ्रष्टाचाराचा आरोप असणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार मुकुल रॉय त्यागपत्र देऊन भाजपमध्ये जाणार

सरकारला देश भ्रष्टाचारमुक्त करायचा असल्यामुळे भ्रष्टाचारी नेता सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचे स्वप्न कसे पाहू शकतो ?

कोलकाता – तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार मुकुल रॉय यांनी ते खासदारकीचे आणि पक्षाचे त्यागपत्र देणार असल्याचे घोषित केले आहे; मात्र त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीचे त्यागपत्र दिले आहे. या संदर्भात नवरात्रोत्सवानंतर बोलणार असल्याचे रॉय यांनी म्हटले आहे. रॉय यांचे नाव शारदा चिटफंड घोटाळ्यामध्ये आले असून सीबीआय त्यांची चौकशी करत आहे. या संदर्भात तृणमूल काँग्रेसने अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मुकुल रॉय हे तृणमूलच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर रॉय स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.


Multi Language |Offline reading | PDF