नगर येथे १५ गायींची कत्तल करणार्‍या ५ धर्मांधांना अटक

३ धर्मांध पळून गेले

गोरक्षकांवर कारवाईची मागणी करणार्‍यांना या गोहत्यांविषयी काय म्हणायचे आहे ? गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही सरकार स्वतः गोरक्षण करत नाही आणि गोरक्षकांनाही करू देत नाही. त्यामुळेच धर्मांधांकडून गायींची वारंवार कत्तल केली जात आहे. जोपर्यंत अशा धर्मांधांवर सरकार कठोर कारवाई करत नाही, तोपर्यंत गायींच्या हत्या थांबणार नाहीत, हे सरकारने जाणावे  !

नगर – येथील पशूवधगृहांवर पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत १५ गायींची कत्तल करण्यात आल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी ५ धर्मांधांना अटक केली. एजाज जानमहंमद कुरेशी (वय ३७ वर्षे), मुनाब महेमूद कुरेशी (वय २४ वर्षे), आकिब आरिफ कुरेशी (वय २२ वर्षे), अल्ताफ अब्दुल कुरेशी (वय २० वर्षे) आणि रमीस राजमोहंमद शेख (वय २० वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. अरबाज कुरेशी, आरिफ अहमदलाल कुरेशी आणि इरफान कुरेशी हे तिघे पळून गेले. या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलिसांनी या वेळी साडेसात लाख रुपये मूल्याचे गायीचे मांस जप्त केले आणि पशूवधगृहातून गाय अन् वासरू यांना वाचवले.


Multi Language |Offline reading | PDF