अवैधरित्या हायड्रोजनयुक्त गॅस सिलिंडर वापरणार्‍या फुगेविक्रेत्यांकडे दुर्लक्ष करणारे पोलीस !

पोलिसांचा हा कायदाद्रोह नव्हे का ?

‘गॅसफुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सिलिंडरचा स्फोट होऊन फुगेवाल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील भांडुप परिसरात घडली. या स्फोटात फुगे विक्रेत्याचे २ सहकारीही घायाळ झाले. जानेवारी २०१६ मध्ये अशाच प्रकारची घटना कल्याण येथील एका शाळेजवळ घडली होती. यामध्येही फुगे विक्रेत्याचा मृत्यू होऊन ५ विद्यार्थी आणि ७ पालक गंभीररित्या घायाळ झाले होते. यांतील एका विद्यार्थ्याला कायमस्वरूपी दृष्टी गमवावी लागली होती. वरील दोन्ही प्रकरणांत फुगेविक्रेते हायड्रोजनयुक्त गॅस सिलिंडर अवैधरित्या वापरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF