बंधपत्रित सेवा (बॉण्ड) पूर्ण न केलेल्या २ सहस्र बोगस आधुनिक वैद्यांवर कारवाई होणार  

असे बोगस आधुनिक वैद्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला लागलेला कलंकच !

मुंबई – राज्यातील सार्वजनिक, तसेच पालिका वैद्यकीय महाविद्यालयांतून पदवी, तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या २ सहस्र आधुनिक वैद्यांनी अजूनपर्यंत ग्रामीण भागात जाऊन सेवा दिलेली नाही. त्यामुळे बंधपत्रित सेवा (बॉण्ड सेवा) पूर्ण न केलेल्या २ सहस्र आधुनिक वैद्यांना ‘बोगस’ समजून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत अशांवर केवळ दंडात्मक कारवाई केली जायची; मात्र ती भरूनही काही जण त्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न करायचे.

 


Multi Language |Offline reading | PDF