गेल्या ४० वर्षांपासून जर्मनीतील महिलेकडून वृद्ध, आजारी आणि घायाळ झालेल्या गोवंशांची सेवा

गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर टीका करणारे जर्मन महिलेचे गोप्रेम जाणतील का ?

मथुरा – येथील कोन्हई गावापासून काही अंतरावर राधा सुरभी गोशाळा आहे. येथे १ सहस्र २०० वृद्ध गाय, बैल आणि वासरू आहेत. यात विविध कारणामुळे आजारी असणारे गोवंश आहेत. ही गोशाळा सुदेवी दासी या गेल्या ४० वर्षांपासून निःस्वार्थपणे करत आहेत. सुदेवी दासी यांचे मूळ नाव फ्रेडरिक इरिन ब्रूनिंग असून त्या जर्मनीच्या आहेत. वर्ष १९७८-७९ मध्ये पर्यटक म्हणून त्या भारतात आल्या होत्या. त्या वेळी त्यांचे वय २० वर्षे होते. त्या नेपाळ, थायलंड, सिंगापूर आणि इंडोनेशिया  येथे फिरून आल्या; परंतु त्यांचे मन मथुरेमध्येच रमले.

१. सुदेवी म्हणाल्या की, राधाकुंड येथे गुरूंची दीक्षा घेऊन साधना करत होते. एक दिवस त्यांना गाय पाळण्याविषयी सूचवण्यात आले आणि तेव्हापासून त्या गोपालन करत आहेत.

२. सुदेवी यांचे वडील जर्मन सरकारमध्ये मोठे अधिकारी होते. सुदेवी त्यांच्या एकुलत्या एक संतान असल्याने त्यांनी त्यांचे स्थानांतर देहलीतील जर्मन दुतावासामध्ये करून घेतले. त्यांनी सुदेवी यांना पुन्हा जर्मनीत नेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या गेल्या नाहीत.

३. गोशाळेची रुग्णवाहिका प्रतिदिन ८-१० घायाळ गोवंशांना  गोशाळेत घेऊन येते. येथे त्यांच्यावर उपचार केले जातात. तसेच अन्य गोशाळांतील आजारी आणि वृद्ध गायी येथे आणल्या जातात.

४. गोशाळेमध्ये ६० जण काम करत आहेत. प्रतिमास २५ लाख रुपये खर्च केले जातात. हा खर्च त्या त्यांच्या बर्लिन येथील संपत्तीतून मिळणार्‍या भाड्यातून, तसेच दानातून करतात.


Multi Language |Offline reading | PDF