जगभरात प्रतिदिन १०० पैकी २५ मृत्यूंना हृदयरोगच कारणीभूत !

पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचा हा परिणाम !

नागपूर – वयाच्या पन्नाशीत त्रास देणारा हृदयविकार सध्याच्या काळात तिशी किंवा चाळीशीतच होत असल्याचे उघड झाले होते. जगभरात दगावणार्‍या प्रत्येक १०० व्यक्तींपैकी किमान २५ मृत्यू केवळ हृदयरोगाने होतात. अशिया खंडातील देशांमध्ये हेच प्रमाण ३० टक्क्यांंवर गेल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.

१. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार जगभर संसर्गजन्य आजारांनी दगावणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने अल्प होत आहे आणि हृदयरोगाने दगावणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

२. जगात प्रत्येक ३३ सेकंदांत एकाला हृदयविकाराचा झटका येतो. असा झटका आलेल्या ५ टक्के जणांचा गोल्डन अवरमध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू ओढवतो.

३. असंसर्गजन्य आजारांमध्ये हृदयरोग हा मधुमेहानंतर आजच्या जीवनशैलीचा सर्वांत गंभीर आजार आहे.

४. असंतुलित वागणे आणि खाणे-पिणे यांचा हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे ते थकते, असे आधुनिक वैद्यांचे म्हणणे आहे.

५. हृदयविकाराचा धक्का येण्यापूर्वी डाव्या हातात जळजळ, छातीत डाव्या बाजूला जळजळ, मळमळणे, पाठीत डाव्या बाजूने दुखणे, खांदे दुखी, सतत घाम येणे, चालतांना दम लागणे, धाप लागणे, मान, गळा येथे दुखणे ही लक्षणे जाणवतात.


Multi Language |Offline reading | PDF