बांगलादेशच्या बोग्रा जिल्ह्यात हिंदुमुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

रोहिंग्यांविषयी कळवळा दाखवणारे बांगलादेशातील हिंदूंवर धर्मांधांकडून होणार्‍या अत्याचारांवर सोयीस्करपणे मौन बाळगतात !

ढाका – बांगलादेशच्या बोग्रा जिल्ह्यातील सोनातोला उपजिल्ह्यात काही धर्मांधांनी १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिला अज्ञात स्थळी नेले. तेथे तिचे इस्लाममध्ये धर्मांतर केले आणि नंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला, असे वृत्त बांगलादेशातील दैनिक ‘आलो प्रोतिदिन’ने१७ सप्टेंबरला प्रसिद्ध केले आहे. अखेर ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या प्रयत्नामुळे मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले.  बांगलादेशच्या होबिगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही हिंदु मुलगी गाझीपूर जिल्ह्यातील एका कापड गिरणीत कामाला होती. एके दिवशी कामावरून घरी परतत असतांना तिचे अपहरण करण्यात आले. बोग्रा जिल्ह्यातील काही धर्मांधांनी हिंदु मुलीचे अपहरण केल्याचे वृत्त कळताच ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे प्रतिनिधी बिकाश करमाकर यांनी तिच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू केले. त्यांनी सोनातोला पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आणि पोलिसांच्या साहाय्याने शोधाशोध चालू केली. अखेर त्यांना मुलीचा ठावठिकाणा लागला; मात्र त्याच वेळी सुमारे १५० जिहाद्यांंनी पोलिसांसमोरच त्या मुलीला पुन्हा पळवले. पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह जिहाद्यांचा पाठलाग केला आणि मुलीची सुटका केली. सदर मुलीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. नंतर त्या मुलीला बोग्राच्या न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उपस्थित करण्यात आले. आपल्यावर धर्मांधांनी बलात्कार केल्याचे त्या मुलीने न्यायदंडाधिकार्‍यांसमोर सांगितले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या प्रयत्नांमुळे मुलीची सुटका झाल्याचे सांगून मुलीच्या पालकांनी संस्थेचे आभार मानले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now