म्यानमारला रोहिंग्या मुसलमानांना परत घ्यावेच लागेल ! – शेख हसीना

अमेरिकेमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रतिपादन

न्यूयॉर्क – बांगलादेशातील शरणार्थ्यांच्या छावण्यांमध्ये रहात असलेल्या ४ लाख २० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारला परत घ्यावेच लागेल, असे आम्ही म्यानमारला स्पष्टपणे सांगितले आहे. ते तुमचेच नागरिक आहेत. त्यांना तुम्ही शरण आणि सुरक्षा दिली पाहिजे. त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत, असे प्रतिपादन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी न्यूयॉर्कमध्ये केले. त्या सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. येथील बांगलादेशी कार्यकर्त्यांशी बोलतांना शेख हसीना म्हणाल्या की, म्यानमारवर आणखी आंतररराष्ट्रीय दबाव बनवला पाहिजे. आम्ही कुटनीतीचाही प्रयत्न करत आहोत, ज्यामुळे म्यानमारला रोहिंग्यांना परत घ्यावे लागेल; मात्र अद्याप म्यानमारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.


Multi Language |Offline reading | PDF