दोन्ही धर्मियांना एकत्रित उत्सव साजरा का करू देत नाही ?

बंगालमध्ये मोहरमच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जनावरील बंदीचे प्रकरण

कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला फटकारले !

कोलकाता – दोन्ही धर्मियांना एकत्रित उत्सव साजरा का करू देत नाही ? जर तुम्ही म्हणता की, राज्यात धार्मिक सद्भावना आहे, तर तुम्ही दोन्ही धर्मांमध्ये धार्मिक भेद का करत आहात ? त्यांना बंधूभावाने राहू द्या. त्यांच्यामध्ये रेषा ओढू नका. त्यांना एकत्र राहू द्या, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला फटकारले. ३० सप्टेंबरला विजयादशमीच्या दिवशी सायंकाळपासून ते १ ऑक्टोबरपर्यंत मोहरमच्या मिरवणुकीमुळे दुर्गामूर्ती विसर्जनावर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावर २० सप्टेंबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील शब्दांत बंगालच्या सरकारला फटकारले. गेल्या वर्षीही ममता बॅनर्जी सरकारने अशीच बंदी घातली होती आणि त्या वेळीही न्यायालयाने सरकारला असेच फटकारले होते. तरीही त्यांनी यावर्षी ही बंदी घातली. (उघडपणे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारे ममता बॅनर्जी सरकार लोकशाहीची थट्टाच करत आहे. असे सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवटच आणली पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF