श्रीमद्भगवद्गीतेचे पठण करण्याच्या स्पर्धेत विजयी झालेल्या मुसलमान मुलीला मौलवींच्या दबावामुळे शाळा पालटावी लागली !

सर्वधर्मसमभावाविषयी बोलणारे पुरोगामी आणि निधर्मीवादी याविषयी का बोलत नाहीत ?

फिरदौस पठणाच्या स्पर्धेत विजयी झाल्यावर बातम्या देणारी प्रसारमाध्यमे या घटनेविषयी गप्प का ?

भुवनेश्‍वर (ओडिशा) – श्रीमद्भगवद्गीतेचे पठणाची स्पर्धा जिंकणार्‍या ओडिशाच्या सोवानिया शिक्षाश्रममध्ये शिकणारी ५ वर्षांची मुसलमान विद्यार्थिनी फिरदौस हिच्या पालकांवर स्थानिक मौलवींनी घातलेल्या दबावानंतर तिची शाळा पालटण्यात आली आहे.

१. मौलवींचे म्हणणे आहे की, शाळेमध्ये प्रतिदिन गीतेचे पठण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

२. फिरदौसचे नातेवाईक यांनीही तिच्या गीता पठणावर अप्रसन्नता व्यक्त केली होती. फिरदौसचे वडील सौदी अरेबियामध्ये काम करतात. त्यांनी फिरदौसची शाळा पालटण्यास सांगितले.

३. मार्च महिन्यात झालेल्या स्पर्धेमध्ये विजयी झाल्यावर फिरदौसची आई आरिफा बीवी म्हणाल्या होत्या की, मला फिरदौसवर गर्व आहे. तिच्या विजयाचे श्रेय तिच्या शिक्षकांना जाते.

४. शाळेतील शिक्षिका उर्मिला यांनी सांगितले की, शाळेमध्ये मुसलमान आणि हिंदु दोन्ही धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत प्रत्येक धर्माच्या ग्रंथांमधील नैतिक शिक्षण दिले जाते.


Multi Language |Offline reading | PDF