मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात कारवाई करणे सोडून केवळ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करणारे पोलीस !

हिंदुद्वेषी पोलीस !

‘२५ ऑगस्ट २०१७ या दिवशी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी राजारामपुरी, कोल्हापूर येथे ३ गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांची अनुमती नसतांना ‘डॉल्बी’ यंत्रणा चालू करून मिरवणूक काढली. त्यामुळे या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांसह २९ जणांच्या विरोधात गुन्हे नोंद केले. (सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाविषयी दिवसांतून ५ वेळा बांग देणार्‍या मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातही कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. याची माहिती पोलिसांना आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वारंवार निवेदन देऊनही पोलीस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात काहीही कारवाई न करता केवळ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करून हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)       

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF