राज्यात आरोपींवरील गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ९ वरून ५२ प्रतिशतपर्यंत पोहोचले ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • ” विश्‍वगुरु बनवण्याचे ध्येय असणार्‍या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी १०० टक्के गुन्हे सिद्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. “

  • पिढीला धर्मशिक्षण देणे, ही गुन्हेगारीप्रवृत्ती रोखण्याचा परिणामकारक उपाय होय !

मुंबई, १९ सप्टेंबर – ‘सीसीटीएन्एस्’ प्रणालीद्वारे सर्व पोलीस ठाणी एकमेकांशी जोडल्यामुळे गुन्हेगारांची माहिती सर्वच पोलीस ठाण्यांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा माग काढणे सोपे झाले आहे. अशी प्रणाली विकसित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. यापूर्वी १०० पैकी ९ गुन्हांत आरोपींना शिक्षा व्हायची, आता मात्र गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ५२ प्रतिशतवर पोहोचले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात दिली.

या वेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले –

१. ‘भारतनेट’च्या धर्तीवर राज्यात ‘महानेट’ योजनेतून ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्याचे काम चालू आहेे. आतापर्यंत १४ सहस्र ग्रामपंचायती फायबर ऑप्टिक्सने जोडण्यात आल्या आहेत. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व ग्रामपंचायतींमध्ये महानेटचे काम होईल. ४ सहस्र कोटी रुपयांच्या या योजनेसाठी राज्य शासन १ सहस्र २०० तर केंद्र शासनाकडून २ सहस्र ८०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. (ग्रामपंचायतींना तांत्रिक सुबत्ता देण्याबरोबरच गावातील लोक खर्‍या अर्थाने सुखी कसे होतील, हे पहायला हवे. – संपादक)

२. शेततळ्याचे पैसे थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केल्यामुळे भ्रष्टाचार थांबला.


Multi Language |Offline reading | PDF