कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक

बांधकाम व्यावसायिकांकडे खंडणी मागितल्याचे प्रकरण

गुन्हेगारीच्या विळख्यात भारत !

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

ठाणे, १९ सप्टेंबर ( वार्ता.) – येथील बांधकाम व्यावसायिकांकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी कुप्रसिद्ध गुंड आणि आतंकवादी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह इक्बाल पारकर, महंमद यासीन ख्वाजा हुसेन शेख आणि अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. चकमक प्रकरणी ९ वर्षे निलंबित असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी इक्बाल याला त्याची बहिण हसिना पारकर यांच्या घरातून कह्यात घेतले.

मुंबईतील नागपाडा परिसरातून त्यांना १८ सप्टेंबरला रात्री उशिरा अटक केल्यानंतर १९ सप्टेंबरला दुपारी ठाणे न्यायालयात त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही सहभागी असल्याचे समजते.

ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणीच्या रूपाने ३० लाख रुपये आणि ४ खोल्या घेतल्यानंतर इक्बालकडून अजून खंडणी मागितली जात होती. त्यामुळे त्याच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. या प्रकरणात अमली पदार्थ तस्करांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

ठाण्याप्रमाणे वाशी येथील १५ ते २० सुवर्णकार आणि बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे खंडणी मागितली असल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. हे अन्वेषण भविष्यात गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात येणार असून मनीलाँड्रिंग, तसेच अमली पदार्थ यांच्याविषयीचे अन्वेषणही विविध अन्वेेषण यंत्रणांच्या माध्यमातून ठाणे पोलीस करणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF