पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफ्आय) बंदीची शक्यता

आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे पुरावे

नवी देहली – केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर (पीएफ्आय) आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्याने तिच्यावर बंदी घालण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय या संदर्भात विचार करत आहे.

१. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, पीएफ्आय आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवणे, बॉम्ब बनवणे यांसारख्या कारवाया करत आहे. तसेच यापूर्वी पीएफ्आयकडून एका प्राध्यापकाचा हात कापण्यात आल्याच्या घटनेचाही यात उल्लेख आहे. पीएफ्आयच्या केंद्रावरून प्राणघातक शस्त्रे, गावठी बॉम्ब, अत्याधुनिक बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आल्याच्या घटनेचाही उल्लेख आहे.

२. अवैध कारवायाविरोधी कायद्याच्या अंतर्गत पीएफ्आयवर बंदी घालता येऊ शकते, असे एन्आयएचे म्हणणे आहे.

३. पीएफ्आयवर बेंगळुरू येथे संघस्वयंसेवक रुद्रेश यांची हत्या, इस्लामिक स्टेट अल् हिंदी या आतंकवादी संघटनेबरोबर मिळून दक्षिण भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचण्याचाही आरोप आहे.


Multi Language |Offline reading | PDF