सर्जिकल स्ट्राईकनंतर गेल्या वर्षभरात आतंकवादी कारवायांमध्ये वाढच

६९ सैनिक हुतात्मा

एका सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हे सामान्य नागरिकालाही समजते; भारतीय शासनकर्त्यांना ते समजत नाही, असे कसे म्हणता येईल ?

नवी देहली – भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला २९ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे. या कारवाईनंतर पाकपुरस्कृत आतंकवादी कारवायांचे प्रमाण न्यून होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती; मात्र गेल्या वर्षभरात कारवायांमध्ये वाढच झाली आहे. तसेच पाककडून होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघनदेखील वाढले आहे. यात ६९ भारतीय सैनिक हुतात्मा झाले, तर या कालावधीत भारताने १७८ आतंकवाद्यांना ठार केले आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या आधी, म्हणजेच मागील वर्षीच्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ३८ सैनिक हुतात्मा झालेे. यामध्ये उरी येथील आक्रमणातील १९ हुतात्मा सैनिकांचा समावेश आहे.


Multi Language |Offline reading | PDF