रोहिंग्या मुसलमानांचे पाकमधील आतंकवाद्यांशी संबंध असल्याने भारताला धोका ! – केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

रोहिंग्या मुसलमान भारतात घुसेपर्यंत सरकार झोपा काढत होते का ? आता त्यांना बाहेर काढण्यासाठी किती अडथळे येत आहेत, हे सरकारच्या लक्षात येत आहे का ? आतातरी सरकार सतर्क होऊन ‘भारतात कोणालाही घुसखोरी करू देणार नाही’, हे जनतेला ठामपणे सांगू शकते का ?

नवी देहली – रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तानमधील आयएस्आय, इसिस आणि अन्य आतंकवादी संघटना यांच्याशी संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून देशाच्या सुरक्षेला धोका आहे, असे गुप्तचर यंत्रणांकडून कळले आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत भारतात रहाण्याची अनुमती दिली जाऊ नये, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे म्हटले आहे. पुढील सुनावणीच्या आधी रोहिंग्यांच्या अवैध कारवायांविषयीचे सर्व पुरावे सादर केले जातील, असेही सरकारने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३ ऑक्टोबर या दिवशी पुढील सुनावणी ठेवली आहे.

केंद्र सरकारने देशातील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना देशातून हाकलण्याचे घोषित केल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावर सुनावणीच्या वेळी सरकारने हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

या प्रतिज्ञापत्रात पुढीलप्रमाणे सूत्रे मांडण्यात आली आहेत.

१. भारतात अवैधरित्या रहाणार्‍या रोहिंग्यांकडे संयुक्त राष्ट्रांची कसलीही कागदपत्रे नाहीत. त्यांना भारतात रहाण्याची अनुमती दिली जाणार नाही.

२. मध्यस्थांच्या साहाय्याने भारत-म्यानमार सीमा पार करून हे लोक भारतात आले आहेत. (भारताच्या सीमा मध्यस्थांच्या माध्यमातून पार करता येऊ शकतात, तर शत्रू आणि आतंकवादी कोणाच्याही वेशात भारतात घुसू शकतात ! सीमेवरील सैनिक अशा वेळी काय करत असतात ? – संपादक)

३. अवैधरित्या रहाणार्‍या रोहिंग्यामुळे देशातील काही भागांत लोकसंख्येचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे.

४. भारतात घुसलेले अनेक रोहिंग्या मुसलमान हवाला, मानवी तस्करी यांसारखे गुन्हे आणि देशविरोधी कारवाया यांमध्ये सामील आहेत. (अशांपैकी एकावर तरी सरकारने कठोर कारवाई केली आहे का ? – संपादक) 

५. आतंकवादाकडे आकर्षिले गेलेले काही रोहिंग्या मुसलमान काश्मीर, देहली, मेवाड आणि भाग्यनगर येथे सक्रीय आहेत. (असे सांगतांना सरकारला स्वतःच्या निष्क्रीयतेची लाज वाटत नाही का ? – संपादक)

६. भारतातील अनेक रोहिंग्या मुसलमानांनी अवैधरित्या मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड बनवली आहेत. त्याचा वापर हवालामार्गे पैसे जमवण्यासाठी केला जातो. (काल घुसखोरी करून आलेले रोहिंग्याही देशातील ओळखपत्रे सहजपणे बनवून गुन्हेगारी कृत्य करू शकतात, यावरून देशाची सुरक्षा किती तकलादू आहे, हे उघड होते ! हे त्यांच्याकडून करण्यात येईपर्यंत सरकारला याची माहिती होत नाही, हे आणखी लज्जास्पद होय ! ही स्थिती हिंदु राष्ट्रातच पालटली जाईल ! – संपादक)

(म्हणे) ‘रोहिंग्या मुसलमानांना हाकलून लावाल, तर देहलीचे शासन उखडून फेकू !’ – मौलाना शब्बीर अली आझाद वारसी यांची धमकी

कोलकाता येथे लाखो मुसलमानांची रोहिंग्यांच्या समर्थनार्थ सभा

रोहिंग्यांच्या समर्थनार्थ देशातील मुसलमान मोर्चा काढून त्यांची शक्ती दाखवत आहेत, हे लक्षात घ्या ! अशांनी उद्या कायदा हातात घेतला, तर सरकारकडे त्यांना रोखण्याची शक्ती आहे का ?

काश्मीरमधील मूठभर दगडफेक आतंकवाद्यांना रोखू न शकणारे सरकार या धर्मांधांना कसे रोखणार ?

अशी धमकी देण्याचे धाडस कसे होते ? सरकारचा आणि कायद्याचा त्यांना धाक नाही का ?

केंद्र सरकारने तात्काळ अशा देशद्रोह्यांना अटक करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, हीच राष्ट्राभिमान्यांची अपेक्षा आहे !

कोलकाता – सर्व मुसलमान बंधू आहेत. हा बंगाल आहे. आसाम किंवा गुजरात नाही. येथील रोहिंग्या मुसलमानांना हात लावण्यासाठी कुणी मायेच्या पुतांनी प्रयत्न करू नये. तसे झाले, तर देहलीतील सत्ता हिंसाचार करून उलथवून टाकू आणि नवीन इतिहास रचू, या शब्दांत शब्बीर अली आझाद वारसी या मौलानांनी रोहिंग्या मुसलमानांना समर्थन देण्यासाठी ११ सप्टेंबर या दिवशी कोलकाता येथे आयोजित १८ मुसलमान संघटनांच्या भव्य सभेत उघड धमकी दिल्याची चित्रफीत उपलब्ध झाली आहे. (हे देशाविरुद्ध उघड उघड पुकारलेले युद्ध आहे. या मौलानावर ममता (बानो) बॅनर्जी यांचे सरकार काही कारवाई करील, अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. आता केंद्रशासनानेच बंगालमधील ममता(बानो) यांचे सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, हाच एक मार्ग उरला आहे ! – संपादक) या सभेत काही लाख मुसलमानांनी सहभाग घेतला होता. त्यात ‘अल्लाहू अकबर’, ‘इस्लाम झिंदाबाद’ असे नारे देण्यात आले होते.

(म्हणे) ‘आतंकवादी संघटनांशी संबंध नाही !’ – रोहिंग्यांच्या आतंकवादी संघटनेचा दावा

रोहिंग्या आतंकवाद्यांचा हा दावा कधीतरी मान्य करता येईल का ?

यंगून (म्यानमार) – जागतिक स्तरावरील कोणत्याही जिहादी आतंकवादी संघटनांशी आमचा संबंध नाही, असे रोहिंग्या आतंकवाद्यांची संघटना ‘अराकान रोहिंग्या सालवेशन आर्मी’ने (‘आरसा’ने) म्हटले आहे. अल कायदाने ‘रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ उभे रहा’, असे आवाहन केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर रोहिंग्यांकडून हे सांगण्यात आले आहे.

रोहिंग्यांच्या विरोधातील सैन्य कारवाई थांबवा ! – संयुक्त राष्ट्र

संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख एंटोनियो गुटरेस यांनी ‘म्यानमारकडून राखिन प्रांतात चालू असलेली रोहिंग्यांच्या विरोधातील कारवाई थांबवावी, तसेच देश सोडून गेलेल्या लोकांना परत येण्याचा अधिकार द्यावा’, असे आवाहन केले आहे.

मतांसाठी बांगलादेशकडून रोहिंग्यांना आश्रय ! – तस्लिमा नसरीन यांची टीका

नवी देहली – रोहिंग्या मुसलमानांना बांगलादेशकडून दिला जाणारा आश्रय माणुसकीच्या दृष्टीकोनातून नसून तो केवळ मते डोळ्यासमोर ठेवून देण्यात आला आहे,  अशी टीका प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. यात तस्लिमा यांनी पुढे म्हटले आहे की, ‘शेख हसीना या त्यांची मतपेढी वाढवण्यासाठी माणुसकीचे नाटक करत आहेत. म्यानमारचे लोक जर हिंदू, बौद्ध किंवा ख्रिस्ती असते, तर त्यांना माणुसकीच्या दृष्टीकोनातून शेख हसीना यांनी साहाय्य केले असते का ?’, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे.

बांगलादेशमध्ये सध्या ४ लाख रोहिंग्या मुसलमानांनी आश्रय घेतला. येथील सीमाभागातील २ सहस्र एकर भूमीवर १४ सहस्र छावण्या उभारण्यात येणार आहेत. बांगलादेशचे सैन्यदल आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांंच्या साहाय्याने या छावण्यांची निर्मिती करण्यात येत आहे.

(म्हणे) ‘रोहिंग्यांपासून धोका नाही ! – ओमर अब्दुल्ला

रोहिंग्यांपासूनच नव्हे, तर अब्दुल्ला पिता-पुत्रांपासूनही देशाला धोका आहे, हे त्यांच्या सातत्याने करण्यात येणार्‍या देशद्रोही विधानांमुळे निदर्शनास येत आहे ! केंद्र सरकार आणखी किती दिवस त्यांना मोकळे सोडणार आहे ?

श्रीनगर – रोंहिग्या मुसलमानांपासून देशाला कोणताच धोका नाही, असा दावा ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे केला आहे. रोहिंग्यापासून जम्मू-काश्मीरला धोका असल्याची गोष्ट २०१४ पूर्वीची आहे. वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये रोहिंग्याचा धोका असल्याचा असा कोणताही अहवाल गुप्तचर विभागाने सादर केलेला नाही, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF