रोहिंग्या मुसलमानांना भारतात शरणार्थी म्हणून प्रवेश देऊ नये !

कल्याण येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी राष्ट्र आणि धर्म प्रेमी

कल्याण, १८ सप्टेंबर (वार्ता.) – आधीच बांगलादेशी घुसखोरांचे नंदनवन झालेल्या भारतात रोहिंग्या मुसलमानांना स्थान देणे म्हणजे नवीन समस्यांना जन्म देण्यासारखे आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना भारतात शरणार्थी म्हणून प्रवेश देऊ नये, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रबोधन फेरी आणि निदर्शने यांच्या माध्यमातून कल्याण येथे आंदोलनात केली.

कल्याण पश्‍चिम येथील शिवाजी महाराज चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रबोधन फेरीला आरंभ करण्यात आला.

या मोर्च्यात हिंदु महामंडल, हिंदु राष्ट्र सेना, बजरंग दल, अखंड हिंदू, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सह्याद्री प्रतिष्ठान, परशुराम ब्रिगेड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी ‘रोहिंग्यांचा धोका ओळखा आणि याला संघटितपणे विरोध करा’, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. गणेश पवार यांनी केले. श्री. सागर शुक्ल या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याने आंदोलनाच्या प्रचार, प्रसार आणि आयोजन यांचे दायित्व पार पाडले.

रोहिंग्या येणार्‍या काळात देशावर सर्वात मोठे संकट म्हणून उभे रहातील ! – आशिष पाण्डेय, हिंदु राष्ट्र सेना, कल्याण

म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान आपल्या देशातील राजधानी देहलीपासून ते जम्मू, बंगाल, बिहार, तेलंगणा आदी अनेक राज्यांत घुसखोरी करून रहात आहेत. वर्ष २००९ पासून यातील बहुसंख्य रोहिंग्या मुसलमान जम्मूमध्ये अवैधरित्या रहात आहेत. एकीकडे भारताचे नागरिक असलेल्या जम्मू-काश्मीरमधील साडेचार लाख हिंदूंना काश्मीरमधून हाकलले जाते आणि काश्मीरमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्याची कोणतीही ठोस योजना नाही. असे असतांना या रोहिंग्या मुसलमानांसाठी स्वतंत्र वसाहतींसाठी भूमी दिली जाते. आतातर त्याही पुढे जाऊन या घुसखोर मुसलमानांसाठी पक्की घरे देण्याचे काम चालू करण्यात आले आहे. मार्च मासामध्ये यांपैकी अनेक रोहिंग्या मुसलमानांकडे निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड आणि शिधापत्रिकाही सापडल्या आहेत. यावरून हा प्रश्‍न किती गंभीर बनत आहे, हेच लक्षात येते. हे रोहिंग्या येणार्‍या काळात देशावर सर्वांत मोठे संकट म्हणून उभे रहातील.

बंगालमध्ये मोहरमसाठी श्री दुर्गा विसर्जनावर घातलेली बंदी हा धार्मिक पक्षपात ! – डॉ. उपेंद्र डहाके, कल्याण शहर उपाध्यक्ष, भाजप

धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणार्‍या आपल्या देशात सर्वधर्मियांना आपापल्या पद्धतीने उपासनेचे स्वातंत्र्य राज्यघटनेनेच दिले असतांना बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार मात्र हिंदूंच्या धार्मिक भावनांना वारंवार पायदळी तुडवत आहे. बंगालमध्ये मोहरमच्या निमित्ताने नवरात्रीत श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर एक दिवसाची बंदी घातली आहे. अशा प्रकारे मुसलमानांच्या सणांसाठी हिंदूंच्या उत्सवांवर बंदी घालणे, हा धार्मिक पक्षपात आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली बंदी त्वरित उठवावी आणि ममता बॅनर्जी सरकारला याचा जाब विचारावा.

‘लव्ह जिहाद’च्या भीषण समस्येविषयी शासनाने प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी ! – कैलास जाधव, हिंदु राष्ट्र सेना

‘लव्ह जिहादची’ प्रकरणे हाताळण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी, तसेच ‘लव्ह जिहाद’साठी होणारा अर्थपुरवठा आणि युवतींची तस्करी यांची केंद्रशासनाने सखोल चौकशी करून उत्तरप्रदेश शासनाच्या ‘अ‍ॅण्टी रोमिओ पथकाच्या’ धर्तीवर प्रत्येक राज्यात विशेष दलाची स्थापना करावी. ‘लव्ह जिहाद’च्या भीषण समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना शासनाने करावी.

भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांचा आंदोलनाला पाठिंबा

मी सर्वतोपरी सहकार्य करीन ! – आमदार नरेंद्र पवार, भाजप, कल्याण

मी बाहेरगावी असल्यामुळे मला आंदोलनात सहभागी होता आले नाही; मात्र या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. काही आवश्यकता लागल्यास मी तुमच्यासमवेत असून सर्वतोपरी सहकार्य करीन, असे भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांनी सांगितले आहे.

आंदोलनाला पोलिसांचा विरोध; मात्र नागरिकांचा पाठिंबा !

१. आरंभी या आंदोलनासाठी पोलिसांची अनुमती मिळणे कठीण जात होते; परंतु हे आंदोलन करायचेच यावर धर्माभिमानी ठाम होते. धर्माभिमान्यांच्या पुढाकाराने हे आंदोलन झाले.

२. आंदोलनाचा विषय ऐकणार्‍यांना पोलीस बाजूला करत होते. तरी बाजूला जाऊन नागरिक आंदोलन पहात आणि वक्त्यांचा विषय ऐकत होते.


Multi Language |Offline reading | PDF