कन्नड ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या फेसबूक पानाने ओलांडला १० सहस्र सदस्यसंख्येचा टप्पा !

बेंगळुरू – कन्नड भाषेतील साप्ताहिक सनातन प्रभातच्या ‘कन्नड सनातन प्रभात’ या फेसबूक पानाच्या सदस्यसंख्येने १६ सप्टेंबर २०१७ या दिवशी १० सहस्र सदस्यसंख्येचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. हे पान राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीचे कार्य करत आहे. या पानावर करण्यात येणार्‍या पोस्टमध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या बातम्या, धर्मशिक्षण, सण, दिनविशेष या विषयांचा समावेश असतो.

हे सर्व श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या कृपेमुळेच शक्य झाले आहे, अशी कृतज्ञता कन्नड साप्ताहिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

कन्नड सनातन प्रभात फेसबूक पानाची मार्गिका : https://www.facebook.com/Sanatan.Prabhat.Kannada


Multi Language |Offline reading | PDF