कर्नाटक सरकार येत्या अधिवेशनात (अंध)श्रद्धा निर्मूलन विधेयक मांडण्याची शक्यता

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये येत्या विधीमंडळाच्या अधिवेशनात महाराष्ट्राप्रमाणे (अंध)श्रद्धा निर्मूलन विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता आहे. या कायद्याला यापूर्वी धर्माभिमानी हिंदूंकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे काही काळ मागे पडलेला हा विषय आता पुन्हा एकदा समोर आला आहे.

(अंध)श्रद्धा निर्मूलनासाठी कायदा नव्हे, तर जनजागृती आवश्यक ! – कागोडु तिम्मप्प, महसूलमंत्री, कर्नाटक

महसूलमंत्री कागोडु तिम्मप्प पत्रकारांना म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या धर्तीवर राज्यातही (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. कायद्याने लोकांमध्ये पालट होईल, अशा भ्रमात सरकारने राहू नये. लोकांमध्ये जागृती केली, तरच त्यांच्यात पालट शक्य आहे. (अंध)श्रद्धा निर्मूलन करणे कठीण आहे. त्यासाठी सामान्य जनतेत सातत्याने जागृती करणे आवश्यक आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF