देशात अतीमहनीय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी ३, तर ६६३ लोकांमागे केवळ १ पोलीस

जनतेपेक्षा अतीमहनीय व्यक्तींची अधिक काळजी घेणारा देश भारत !

नवी देहली – देशातील एकूण २० सहस्र अतीमहनीय (व्हीआयपी) व्यक्तींच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी ३ पोलीस तैनात आहेत; मात्र त्या तुलनेत ६६३ लोकांमागे केवळ एकच पोलीस तैनात आहे, अशी माहिती समोर आली आहे. ‘ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या साहाय्याने ‘पोलिसांकडून देण्यात येणार्‍या सुरक्षेचा’ अहवाल बनवला आहे. या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार देशात सध्या १९ लाख २६ सहस्र पोलीस आहेत. यातील ५६ सहस्र ९४४ पोलीस २० सहस्र ८२८ लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.


Multi Language |Offline reading | PDF