बांगलादेशमध्ये धर्मांधांनी अपहरण करून धर्मांतर केलेल्या अल्पवयीन हिंदु मुलीची बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या प्रयत्नामुळे सुटका

बांगलादेशमधील असुरक्षित हिंदू !

ढाका – बांगलादेशच्या किशोरगंज जिल्ह्यातील कोटियाडी पोलीस ठाण्याच्या  हद्दीत ४ धर्मांधांनी एका १५ वर्षीय हिंदु मुलीचे नुकतेच अपहरण केले आणि तिचे बळजोरीने इस्लाममध्ये धर्मांतर केले. बांगलादेशमध्ये हिंदूंच्या हक्कासाठी लढणार्‍या बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या अथक प्रयत्नामुळे अखेर १० दिवसांनी त्या मुलीची सुटका करण्यात आली. ही हिंदु मुलगी शाळेतून घरी जात असतांना वाटेत काही धर्मांधांनी तिचे अपहरण करून तिला अज्ञातस्थळी नेले. महंमद तोरिकुल इस्लाम बायझीद आणि त्याच्या ३ साथीदारांनी मुलीचे अपहरण केल्याचे कळताच मुलीच्या पालकांनी कोटियाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच मुलीच्या अपहरणाविषयी  बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांना कळवले. अधिवक्ता घोष यांनी किशोरगंज जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्याशी संपर्क साधून मुलीच्या सुटकेची मागणी केली. सदर हिंदु मुलगी अल्पवयीन असल्याचे जिल्हादंडाधिकार्‍यांना पटवून देण्यासाठी ते यशस्वी ठरले. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे अखेर १० दिवसांनी पोलिसांनी मुलीची सुटका केली आणि महंमद तोरिकुल इस्लाम बायझीद याला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now