गायींना पूज्य मानणारे कधीच हिंसाचार करत नाहीत ! – सरसंघचालक

गायींना पूज्य मानणारे स्वतःहून कधीच हिंसाचार करत नाहीत; मात्र कोणी गोहत्येसारखी हिंसा करत असेल, तर त्याचा ते नक्कीच विरोध करतात. याला निधर्मीवादी आणि हिंदुद्वेषी ‘हिंसाचार’ म्हणतात ! अशांना गोतस्करांचा हिंसाचार कधीच दिसत नाही !

भारतात गायींना पूज्य मानले जात असतांनाही केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारे त्यांच्या हत्या करण्यावर बंदी घालत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

जयपूर – पूज्य भावनेने जे गो-पालन करतात, त्यांच्या भावना कितीही खोलवर दुखावल्या गेल्या, तरी ते हिंसाचार करत नाहीत, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. जयपूरमधील जामडोली येथे संघाच्या शिबिरात स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. गो-पालन हे आर्थिकदृष्ट्या लाभदायक असल्याने त्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Multi Language |Offline reading | PDF