अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत मोहनदास बेपत्ता

भोंदूबाबांची नावे घोषित केल्यामुळे घटना घडल्याचा संशय

देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची दूरवस्था दाखवणारी घटना !

लक्ष्मणपुरी – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत मोहनदास हरिद्वारहून मुंबईकडे येत असतांना रेल्वेतून बेपत्ता झाले आहेत. प्रयाग येथील बैठकीमध्ये आखाडा परिषदेने १४ भोंदूबाबांची सूची घोषित केली होती. त्यानंतर आखाडा परिषदेला अनेक धमक्या येत होत्या. त्या धमक्यांनंतर महंत मोहनदास बेपत्ता झाले आहेत. महंत मोहनदास बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणाले, ‘‘आम्ही भोंदूबाबांची सूची घोषित केल्यानंतर आम्हाला धमक्या येत होत्या. आता साधू-संतही सुरक्षित नाहीत, संतांच्या सुरक्षेत वाढ करावी.’’


Multi Language |Offline reading | PDF