जिहादी आतंकवादाचे बळी ठरलेल्या काश्मिरी हिंदूंना पुणे येथे श्रद्धांजली

काश्मिरी हिंदू बलिदानदिन

पुणे – जिहादी आतंकवादाचे बळी ठरलेल्या, तसेच धर्मपरिवर्तन न करता हिंदु धर्मातच राहून प्रसंगी मरण पत्करलेल्या काश्मिरी हिंदूंना १४ सप्टेंबर या दिवशी काश्मिरी हिंदू बलिदानदिनानिमित्त येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पनून कश्मीरच्या वतीने लोहगाव येथील काश्मिरी हिंदू भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवादाच्या थैमानामुळे काश्मिरी हिंदूंना स्वतःची जन्मभूमी सोडून विस्थापित व्हावे लागले. लक्षावधी काश्मिरी हिंदूंचे धर्माच्या नावाखाली शिरकाण केले गेले. या घटनेला २७ वर्षे उलटून गेली, तरी अद्याप काश्मिरी हिंदू बांधव त्यांच्या जन्मभूमीमध्ये परतू शकलेले नाहीत. काश्मिरी हिंदू बलिदानदिनाच्या निमित्ताने हिंदूंसाठी काश्मिरमध्ये पनून कश्मीरचे निर्माण करण्याचा आणि पुन्हा एकदा जन्मभूमीमध्ये सन्मानाने पुनर्स्थापित होण्यासाठी लढा चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी डॉ. अमरनाथ भट, पद्मश्री डॉ. काशीनाथ पंडित, श्री. राहुल कौल आदी मान्यवर उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF