एका नामांकित रुग्णालयाकडून आधुनिक वैद्यांना लाच दिली जाणे

वैद्यकक्षेत्रातील अपप्रवृत्ती !

जुलै २०१७ मध्ये एका नामांकित रुग्णालयाचा एक प्रतिनिधी मला भेटायला माझ्या चिकित्सालयात आला. त्याने मला एक बंद लखोटा दिला. मी त्याला याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, तुम्ही आमच्या रुग्णालयात दिलेल्या सेवेचे पैसे आहेत. त्यावर मी त्याला सांगितले, मी तुमच्या रुग्णालयात सेवा दिली नाही. तेव्हा तो म्हणाला, त्या लखोट्यात विवरण उद्धृत केले आहे. त्याचा मान राखून मी त्याच्यासमोर लखोटा उघडला नाही. तो गेल्यानंतर लखोटा उघडल्यावर मला त्यात ६ सहस्र रुपये मिळालेे; पण त्यासमवेत काहीही विवरण नव्हते. काही दिवसांनंतर मला एका औषधोत्पादक आस्थापनाच्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हकडून समजले, त्या रुग्णालयातील ती व्यक्ती हेेच काम करते. (थोडक्यात, मी माझ्या रुग्णांना अत्याधुनिक सुविधा असलेल्या सदर रुग्णालयाकडे रेफर करावे, असा लाच देण्यामागील उद्देश होता.) मी ते पैसे अर्पण केले.

– एक साधक आधुनिक वैद्य (जुलै २०१७)


Multi Language |Offline reading | PDF