बंगालमध्ये गो-तस्करांकडून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची हत्या

• गोरक्षण करणार्‍या गोरक्षकांना समाजकंटक ठरवणारे शासनकर्ते गोतस्करांकडून झालेल्या सैनिकाच्या हत्येविषयी काही बोलतील का ?

• आतापर्यंत अनेकदा गोतस्करांकडून पोलिसांवर गोळीबार करण्याच्याही घटना घडल्या आहेत; मात्र त्यांच्या विरोधात कोणीच काही बोलत नाही आणि शासनकर्तेही गोतस्करांवर कठोर कारवाई करण्याविषयी सांगत नाहीत !

• अनेक राज्यांनी गोहत्या बंदी कायदा केला आहे; मात्र त्याची कार्यवाही नीट होत नाही, ही वस्तूस्थिती आहे !

• आतापर्यंत आतंकवादी हे सैनिकांना ठार करत होते, आता गोतस्करही करू लागले आहेत, हे लज्जास्पद आहे ! याविषयी केंद्रशासनाने ठोस कृती करावी, ही अपेक्षा !

(प्रतिकात्मक चित्र)

बारासात (बंगाल) – बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यामधील बांगलादेशच्या सीमेवर गोतस्करांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची हत्या केली. सैनिकाने गईघाटा येथे गोतस्करांचा ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याची हत्या करण्यात आली. सैनिकाचे नाव तुषार कांतिदास आहे.

पोलीस अधीक्षक पी. सुधाकर यांनी सांगितले की, तुषार कांतिदास सीमा सुरक्षा दलाच्या ६४ बटालियनचे सैनिक होते. गईघाटा येथे त्यांनी एक ट्रक संशयास्पदरित्या जातांना पाहिला असता एका नागरिकासह सायकलवरून या ट्रकचा पाठलाग केला. या वेळी ट्रकने त्यांच्या सायकलला जोरात धडक दिली. यात ते गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात नेले असतांना मृत घोषित करण्यात आले. ट्रकने धडक दिल्यावर तो एका दुकानात घुसला. त्यानंतर चालकाने ट्रक सोडून पलायन केले. मात्र स्थानिकांनी क्लिनरला पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. या ट्रकमधून ४ गायींना सोडवण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF