बडोदा (गुजरात) येथे मोहरमच्या ताजियासाठी वर्गणी न दिल्यामुळे धर्मांधाकडून हिंदूची हत्या

भारतात असहिष्णुता वाढल्याचे आणखी एक उदाहरण ! याविरोधात पुरो(अधो)गामी बोलतील का ?

अन्य धर्मियांच्या सणांसाठी हिंदूंनी वर्गणी देणे बंधनकारक आहे का ? किती अल्पसंख्यांक हिंदूंच्या सणांना वर्गणी देतात ?

बडोदा (गुजरात) – येथील रंग वाटिकाजवळील व्हुडा निवासस्थानात रहाणारे ५७ वर्षीय मनोहर वारिया यांची त्यांच्या शेजारी रहाणारा नाझीर पठाण (वय ३५ वर्षे) याने मोहरमनिमित्त निघणार्‍या ताजियासाठी वर्गणी दिली नाही म्हणून हत्या केली.

वारिया यांंच्या नातेवाइकांनी सांगितले की, जेव्हा मनोहर वारिया त्यांच्या इमारतीच्या खाली बसले होते, तेव्हा शेजारी रहाणारा नाझीर पठाण याने ताजियासाठी वर्गणी मागितली; मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावर नाझीरने वारिया यांना चाकूने भोसकले आणि पळून गेला. वारिया यांना रुग्णालयात नेण्यात आल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. बोपोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.व्ही. परमार यांनी सांगितले की, पोलिसांनी नाझीरची रिक्शा जप्त केली आहे.

इंग्रजी वृत्तपत्राची मखलाशी

वरील घटनेचे वृत्त काही वृत्तपत्रांत प्रकाशित झाले; मात्र एका इंग्रजी वृत्तपत्राने वारिया यांच्या नातेवाइकांच्या माहितीवर विश्‍वास न ठेवता धर्मांधांची बाजू मांडली. त्यात नाझीर आणि वारिया हे मित्र होते अन् दोघात विनोद चालू होते. त्याचे पर्यवसान या हत्येत झाल्याचे वृत्तात म्हटले. (यावरून इंग्रजी वृत्तपत्रांचा हिंदुद्वेष दिसून येतो. विनोद केल्यावर कोणी हत्या करतो का ? असा प्रकार एखाद्या धर्मांधाच्या संदर्भात घडला असता, तर याच वृत्तपत्रांनी रान उठवले असते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF