(म्हणे) ‘रोहिंग्या मुसलमान आतंकवादी नाहीत, तर सामान्य व्यक्ती !’

ममता बॅनर्जी यांचे प्रमाणपत्र !

मोहरमच्या मिरवणुकीसाठी दुर्गामूर्ती विसर्जन एक दिवस पुढे ढकलण्याचा आदेश देणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी यांनी केंद्र सरकारचा आदेश डावलून रोहिंग्यांना बंगालमध्ये आश्रय दिल्यास आश्‍चर्य वाटू नये !

श्रीमंत असणार्‍या सौदी अरेबियासारख्या देशांसह जगभरातील ५७ इस्लामी राष्ट्रे अद्याप त्यांच्या धर्मबांधवांसाठी काहीही बोलत नसतांना, काही करत नसतांना भारतातील निधर्मी मात्र स्वतःचे नातेवाईक असल्याप्रमाणेच रोहिंग्यांसाठी गळा काढत आहेत !

कोलकाता – रोहिंग्या मुसलमान आतंकवादी नाहीत, तर सामान्य व्यक्ती आहेत. केंद्र सरकारने त्यांना साहाय्य केले पाहिजे, असे आवाहन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. (बंगालमध्ये आतंकवादी कारवाया करणार्‍या जिहाद्यांवर कोणतीही कारवाई न करणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी याहून वेगळे काय सांगणार ! – संपादक) ‘आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या आवाहनाचे समर्थन करतो ज्यामध्ये रोहिंग्या मुसलमानांना साहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे’, असेही त्या म्हणाल्या. यापूर्वीही त्यांनी रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ विधान केले होते. (ममता(बानो) बॅनर्जी यांनी स्वतःच्या राज्यातील हिंदूंचे आधी रक्षण करावे आणि मग रोहिंग्यांविषयी बोलावे ! – संपादक) देशातील ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने परत म्यानमारमध्ये पाठवणार असल्याचे केंद्र सरकाराने घोषित केले आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयातही प्रतिज्ञापत्राद्वारे त्यासंदर्भात सांगितले आहे.


Multi Language |Offline reading | PDF