सप्तश्रृंगी गडावर या वर्षीपासून बोकडबळी प्रथेला बंदी !

धर्मांधांच्या हलाल प्रथेवर बंदी आणण्याची मागणी करण्याचे धैर्य कुणी कधी करील का ?

नाशिक – ऐन नवरात्रीच्या तोंडावर सप्तश्रृंगी मंदिर प्रशासनाने बोकडबळी प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरोगामी गेली काही वर्षे ही प्रथा बंद करण्याच्या सिद्धतेत होते. या प्रथेमागे मोठी आर्थिक उलाढाल असल्याचा आरोप पुरोगाम्यांनी केला आहे. (पुरोगामी धर्मांधांकडून धर्माच्या नावाखाली होणार्‍या लक्षावधी प्राण्यांच्या हत्या आणि त्यांतील आर्थिक उलाढाल यांविषयी कधीच काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)

या प्रथेनंतर बंदुकीतून हवेत गोळीबार करण्याची प्रथा आहे. मागील वर्षी या प्रथेच्या वेळी झालेल्या दुर्घटनेत गडावरचे १२ भाविक घायाळ झाले होते. हे निमित्त करून बळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. (बंदुकीच्या फैरी झाडण्याच्या प्रथेच्या वेळी भाविक घायाळ झाले, तर त्या संदर्भातील कारणमीमांसा जाणून त्यावर उपाययोजना करायला हवी. त्यासाठी पुरोगाम्यांच्या सांगण्यावरून धार्मिक प्रथांवर घाला का घालण्यात येतो ? – संपादक)

सप्तश्रृंगी मंदिराच्या परिसरात केवळ ही बंदी आहे. भाविकांच्या वतीने वैयक्तिकरित्या होणार्‍या कार्यक्रमांवर बंदी नाही. काही दिवसांपूर्वी तुळजापूर येथेही मांसाहारी नैवेद्यावर बंदी आणली गेली; मात्र काही घंट्यांत मंदिर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला होता.


Multi Language |Offline reading | PDF