बंगालमधील भाजपच्या कार्यकर्त्याची अमानुष अत्याचार करून हत्या

 केंद्र सरकार आतातरी बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू करणार का ?

भारतातील प्रसारमाध्यमे अशी वृत्ते जाणीवपूर्वक दडपतात, तर तथाकथित पुरोगाम्यांच्या आर्थिक घोटाळ्यांतून हत्या झाल्याची शक्यता असणार्‍या हत्यांच्या वृत्तांना ठळक प्रसिद्धी देतात !

सौमित्र घोशाल

दक्षिण २४ परगणा (बंगाल) – दक्षिण २४ परगणा जिल्ह्याच्या बरुइपूरच्या बूथ क्रमांक ११ चे भाजपचे अध्यक्ष आणि मूर्तीकार असलेले सौमित्र घोषाल (वय २६ वर्षे) यांचा अमानुष छळ करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचे शव एका झाडाला बांधलेले आढळून आले. त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यांचे दोन्ही हात बांधण्यात आले होते. ही घटना ३ दिवसांपूर्वी घडली; मात्र राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील कोणत्याही प्रसारमाध्यमांकडून या वृत्ताला प्रसिद्धी देण्यात आली नाही. ही घटना घडली त्या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बंगालच्या दौर्‍यावर होते. या दौर्‍यात शहा यांनी बंगालमधील भाजपच्या कार्यकर्त्यांवर होणार्‍या आक्रमणांचे वृत्त बंगालमध्ये येऊन संकलित करण्याचे आवाहन प्रसारमाध्यमांना केले होते.

दक्षिण २४ परगणा जिल्ह्याचे भाजपचे सरचिटणीस सुनीप दास यांनी, सौमित्र येथे भाजपचे कार्य वाढवत होते. ते चांगले काम करत होते. त्यामुळेच सत्ताधारी पक्षाकडून त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप केला. तृणमूल काँग्रेसचे बरुइपूर ब्लॉक नेते शामसुंदर चक्रवर्ती यांनी हा आरोप फेटाळून लावला.


Multi Language |Offline reading | PDF