(म्हणे) तस्लिमा नसरीन बहीण, तर रोहिंग्या भाऊ होऊ शकत नाहीत का ? – असदुद्दीन ओवैसी

  • म्यानमारमध्ये हिंदूंना रोहिंग्या आतंकवाद्यांकडून ठार मारण्यात येत आहे, त्याविषयी ओवैसी का बोलत नाहीत ?
  • रोहिंग्या आतंकवाद्यांनी म्यानमारच्या पोलीस ठाण्यांवर सशस्त्र आक्रमण केले, हे ओवैसी का सांगत नाहीत ?
  • रोहिंग्यांची बाजू घेणार्‍या ओवैसींनी कधी काश्मीरमधील विस्थापित हिंदूंविषयी सहानुभूती दाखवली आहे का ?
  • तस्लिमा नसरीन आणि रोहिंग्या आतंकवादी यांची कधीतरी तुलना होऊ शकते का ?

भाग्यनगर / लक्ष्मणपुरी –  बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन भारतात निर्वासित म्हणून रहातात. जर ती तुमची बहीण होऊ शकते, तर रोहिंग्या भाऊ होऊ शकत नाहीत का ?, असा प्रश्‍न एम्आयएम्चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. भारतात आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारत सुरक्षेच्या दृष्टीने परत पाठवणार आहे, असे सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. त्यावर ओवैसी यांनी हा प्रश्‍न विचारला आहे.

या लोकांचे सर्वकाही लुटण्यात आले आहे आणि ज्यांच्याकडे मानवाधिकार आयोगाचा शरणार्थीचा दस्ताऐवज आहे.   अशांना सरकार परत पाठवण्याच्या मागे का लागले आहे ?, असा प्रश्‍नही ओवैसी यांनी उपस्थित केला. चकमा शरणार्थी अरुणाचल प्रदेशात रहात आहेत. तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांना विशेष पाहुणे म्हणून स्थान देण्यात आले आहे. मला आशा आहे की, भारत सरकार रोहिंग्यांना शरण देऊन त्यांच्या मुलांना चांगले जीवन जगण्याची संधी देईल, असे ओवैसी यांनी म्हटले. (फाळणीच्या वेळी भारतात राहिलेले धर्मांध वन्दे मातरम् म्हणत नाहीत, देशात आतंकवादी कारवाया करतात, हिंदूंवर आक्रमण करतात, तेथे रोहिंग्या देशात राहिल्यास कधीतरी देशाशी एकनिष्ठ होऊ शकतील का ? – संपादक)

(म्हणे) रोहिंग्यांप्रती मानवतेचा व्यवहार करा ! – मायावती

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रति मानवतेच्या दृष्टीने वागले पाहिजे. त्यांना देशातून हाकलण्यासाठी राज्यांवर दबाव आणू नये, असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केले आहे. (मुसलमानांच्या मतांसाठी चाललेली मायावती यांची धडपड ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF