सनातनची भूमिका लवकरच प्रसारमाध्यमांसमोर मांडू ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न

मुंबई – बेंगळुरू (कर्नाटक) येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत सनातनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या बिनबुडाच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांना हाताशी धरून प्रसारित केल्या जात आहेत. यातून अन्वेषणाची दिशा जाणीवपूर्वक भरकटवण्याचा प्रकार काही सनातन विरोधक आणि हिंदुद्वेष्टे यांच्याकडून केला जात आहे. या विषयी सनातन संस्थेची भूमिका लवकरच पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांसमोर मांडली जाईल, असे सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.


Multi Language |Offline reading | PDF