लंडनमधील भुयारी रेल्वेस्थानकातील स्फोटामध्ये अनेक जण घायाळ

लंडन – १५ सप्टेंबरला सकाळी दक्षिण लंडनमधील पार्सन्स ग्रीन या भुयारी रेल्वेस्थानकात स्फोट झाला. या स्फोटात अनेक जण घायाळ झाले आहेत. यातील बहुतांश लोक स्फोटामुळे भाजल्याची माहिती समोर येत आहे. प्लास्टिकच्या कचर्‍याच्या बालदीत स्फोट झाल्याचे समोर आले आहे. हा स्फोट कसा झाला, याविषयीची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. या स्फोटानंतर मेट्रो वाहतूक थांबवण्यात आली आहे. लंडनमध्ये सकाळच्या सुमारास सहस्रो लोक मेट्रोमधून प्रवास करतात. कार्यालयांमध्ये पोहोचण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मेट्रोचा वापर करतात.


Multi Language |Offline reading | PDF