हिवरा आश्रमाच्या प्रांगणात शाम मानव यांच्या पुतळ्याचे दहन

बुलढाणा – शुकदास महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधाने केल्याने हिवरा आश्रमाच्या प्रांगणात १४ सप्टेंबर या दिवशी स्थानिक नागरिकांनी शाम मानव यांच्या पुतळ्याचे दहन केले.

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाणा येथील हिवरा येथील स्वामी विवेकानंद आश्रमात घेण्याचे निश्‍चित झाले होते; मात्र येथे संमेलन घेण्यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला होता. परिणामी अखेर हिवरा आश्रमाने साहित्य संमेलनाचा प्रस्ताव माघारी घेत या वादावर पडदा टाकला. त्यामुळे साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण या वर्षीही कायम असल्याचे चित्र आहे.

१. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चित होताच, अ.भा. अंनिसने यावर आक्षेप घेतला.

२. हिवरा आश्रमात संमेलन घेऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती. शुकदास महाराजांच्या आश्रमात साहित्य संमेलन घेऊन साहित्य महामंडळ साहित्य रसिक जनतेसमोर कोणता आदर्श ठेवू इच्छिते, असा प्रश्‍न अ.भा. अंनिसचे शाम मानव यांनी केला होता. (हिवरा आश्रमाकडून साहित्य संमेलनाच्या नियोजनामागील भूमिका पूर्वीच स्पष्ट केली आहे. चमत्कार दाखवा आणि ५ लाख रुपये मिळवा, अशी हास्यास्पद आवाहने करणारे अन् आव्हाने स्वीकारले की, त्याकडे पाठ फिरवणारेे किंवा पळून जाणारे प्रा. शाम मानव यांनी आणि त्यांच्या अ.भा. अंनिसने कोणता आदर्श आतापर्यंत ठेवला आहे ? उलट काही प्रकरणांत मानव यांना शिक्षाही झाली आहे ! – संपादक)

३. साहित्य संमेलनाच्या स्थळावरून निर्माण झालेल्या वादामुळे बुलढाण्यातील हिवरा येथील स्वामी विवेकानंद आश्रमाची आणि विवेकानंदांच्या नावाची अपकीर्ती होत आहे. त्यामुळे हिवरा आश्रमाने हे साहित्य संमेलन विनम्रपणे नाकारावे, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले होते.

४. जोपर्यंत हिवरा आश्रमाकडून अधिकृत माहिती किंवा पत्र मिळत नाही, तोपर्यंत निर्णय घेण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण साहित्य महामंडळाने दिले आहे. हिवरा आश्रमाने माघार घेतल्यास साहित्य संमेलन कुठे भरवण्यात येईल, यावर चर्चा चालू आहे. साहित्य संमेलन भरवण्याची संधी प्रस्तावात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या बडोद्याला देण्यात येईल कि महामंडळ नव्याने प्रस्ताव मागवणार, याविषयीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Multi Language |Offline reading | PDF