उत्तर कोरियाने पुन्हा जपानवरून क्षेपणास्त्र सोडले

सेऊल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाने पुन्हा एकदा जपानवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडले. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियावरील व्यापारावर कठोर निर्बंध लादले आहेत. यास उत्तर देण्यासाठीच त्याने हे क्षेपणास्त्र सोडल्याचे म्हटले जात आहे. उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पुन्हा एकदा तातडीची बैठक बोलावली आहे. उत्तर कोरियाने ऑगस्टमध्ये जपानवरून क्षेपणास्त्र सोडले होते. ते प्रशांत महासागरात पडले होते.


Multi Language |Offline reading | PDF