पोलिसांची हिंदुद्वेषी मानसिकता !

नवी सांगवी, पुणे येथील साई चौकात २० ऑगष्ट २०१७ या दिवशी मूर्तीदानाच्या विरोेधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन चालू होते. त्या वेळी आंदोलनाची अनुमती असतांनाही एका साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आंदोलनस्थळी येऊन कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षकांनी, हे आंदोलन येथे कशासाठी करता ?, असे विचारत १० मिनिटांसाठी ते थांबवले. या वेळी त्यांनी सनातन संंस्थेच्या साधकाला सांगितले की, तुम्ही आंदोलन थांबवून पोलीस ठाण्यात येऊन निवेदन द्या. येथे आंदोलन करण्यापेक्षा तुमच्या मागण्या जिल्हाधिकार्‍यांकडे असतील, तर तिकडे जाऊन आंदोलन करा. त्यावर त्या साधकाने त्यांना आंदोलन कशासाठी आणि का करतो आहोत ? याविषयी सविस्तर सांगितले, तसेच आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही, हेही स्पष्ट केले.

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF