मी भारतीय असल्याने पोपनी तुच्छतेची वागणूक दिली ! – ख्रिस्ती धर्मगुरूचा आरोप

पोपना घरचा अहेर !

नवी देहली – मी भारतीय असल्याने पोप यांना माझी किंमत वाटली नाही, जर मी युरोपीय असतो, तर मला गांभीर्याने घेण्यात आले असते. माझे इसिसने अपहरण केले असतांना व्हॅटीकनने मला कुठलेच साहाय्य केले नाही, असा आरोप येमेन येथून सुटका झालेले भारतातील पाद्री टॉम उझुन्नलील यांनी एका चित्रफितीत केला आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी पुढाकार घेऊन पाद्री टॉम यांची इसिसच्या तावडीतून सुटका करवून घेतली.

येमेनमध्ये अनेक वर्षे तेथील शासन आणि बंडखोर यांच्यात घमासान चालू आहे. त्यात इसिसनेही उडी घेतली आहे. पाद्री टॉम वर्ष २०१० पासून येमेनमधील एडन शहरात मिशनर्‍यांच्या वतीने चालवण्यात येणार्‍या एका वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन बघत होते. त्यांची नेमणूक ५ वर्षांसाठी होती. मात्र त्यानंतरही त्यांच्या जागेवर कुणालाही न नेमता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनाच कारभार पुढे चालू ठेवावा, असे सांगण्यात आले. गेल्या वर्षी मार्च मासांत इसिसने पाद्री टॉम यांचे अपहरण केले.

टॉम यांनी पोप यांना एक चित्रफीत पाठवून साहाय्याची याचना केली; मात्र पोप यांच्याकडून काहीच हालचाल झाली नाही. शेवटी भारतीय शासनाच्या साहाय्याने त्यांची सुटका झाल्यावर टॉम यांनी त्यांचे मन मोकळे केले. (यावरून जातीयवाद, वंशवाद यांचे भूत व्हॅटीकनच्या मानेवर आधीपासून बसले आहे, हे स्पष्ट होते. भारतात होणार्‍या अपवादात्मक घटनांचे अवाजवी भांडवल करून भारतावर टीका करणार्‍या व्हॅटीकनने प्रथम आत्मचिंतन करावे. तसेच त्यांच्या धर्मगुरूंकडून प्रतिदिन घडणार्‍या अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी काय कारवाई केली ते जनतेला सांगावे. या घटनेपासून भारतातील ख्रिस्ती धर्मगुरु काही बोध घेतील का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF