डोकलामप्रश्‍नी खोटे वृत्त प्रसारित करणार्‍या पाकच्या वृत्तवाहिन्यांना चेतावणी

नवी देहली – पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथोरिटीने पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांना चुकीच्या आणि बिनबुडाच्या बातम्या प्रसारित केल्या म्हणून फटकारले आहे. १७ जुलै २०१७ या दिवशी या प्रसारमाध्यमांनी ‘डोकलाम सूत्रावरून भारत-चीन सीमेवर एक भारतीय सैनिक मारला गेला’, असे वृत्त प्रसारित केले होते. यावरून ‘तथ्यहीन बातम्या दाखवू नका, सत्यतेची शहानिशा करूनच बातम्या प्रसारित करा’, अशी चेतावणी नियामक प्राधिकरणाने पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना दिली आहे. भविष्यात अशी कोणतीही चुकीची बातमी प्रसारित केल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही संस्थेने म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF