डॉ. भारत पाटणकर यांच्याकडून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी ! – राहुल कोल्हापुरे, सनातन प्रभात

पत्रकार परिषदेचे निमंत्रण देऊनही डॉ. भारत पाटणकर यांनी सनातन प्रभातच्या वार्ताहराला बाहेर जाण्यास सांगितल्याचे प्रकरण

श्री. राहुल कोल्हापुरे यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर आलेले डॉ. भारत पाटणकर यांच्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण

सातारा – श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी १२ सप्टेंबर या दिवशी सातारा येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण दैनिक सनातन प्रभातचा प्रतिनिधी म्हणून मला मिळाले होते. या पत्रकार परिषदेला मला जाणे काही कारणामुळे शक्य नव्हते; म्हणून मी आमच्या अन्य वार्ताहराला या पत्रकार परिषदेला जाण्यास सांगितले. निमंत्रण देऊनही प्रत्यक्षात पत्रकार परिषदेत डॉ. भारत पाटणकर यांनी ‘आम्ही सनातन प्रभातच्या प्रतिनिधीला बोलावले नाही,’ असे धादांत खोटे बोलून सनातन प्रभातच्या पत्रकाराला तेथून बाहेर जाण्यास सांगितले. सनातन प्रभातच्या पत्रकाराने त्यावरून कोणताही वाद न घालता तो तेथून बाहेर पडला.

एकीकडे समाजापुढे विचारस्वांतत्र्याच्या गप्पा मारणार्‍या डॉ. पाटणकरांनी स्वतःच विचारस्वातंत्र्यावर घाला घालण्याचे कार्य केले. डॉ. पाटणकरांची ही दंडेलशाही वृत्ती म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपीच होय, अशी प्रतिक्रिया सनातन प्रभातच्या पश्‍चिम महाराष्ट्र आवृत्तीचे येथील प्रतिनिधी श्री. राहुल कोल्हापुरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात श्री. राहुल कोल्हापुरे पुढे म्हटले आहे की, श्रमिक मुक्ती दलाचे सातारा जिल्हाप्रमुख डॉ. प्रशांत पन्हाळकर यांनी मला पत्रकार परिषदेचे निमंत्रण ११ सप्टेंबरला दुपारी २.१५ वाजता व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवले होते. या निमंत्रणात ‘१२.९.२०१७ या दिवशी दुपारी १२ वाजता डॉ. भारत पाटणकर यांची पत्रकार परिषद आहे. कृपया यासाठी सातारा येथील सर्किट हाऊसमध्ये यावे’, असे नमूद करण्यात आले होते. तसेच १२ सप्टेंबरला पत्रकार परिषद चालू होण्याच्या वेळीही डॉ. पन्हाळकर यांनी पुन्हा संदेश पाठवून ‘डॉ. भारत पाटणकर यांची प्रेस सर्किट हाऊस येथे सुरू होत आहे. कृपया लवकर यावे’, कळवले होते. असे असूनही एका पत्रकाराला अशी अपमानास्पद वागणूक देणारे

डॉ. पाटणकर उद्या अन्य पत्रकारांशीही अशी वर्तणूक करू शकतात. पत्रकारांचे विचारस्वातंत्र्य नाकारणार्‍या अशा प्रवृत्तीच्या विरोधात सर्व पत्रकारांनी एकजुटीने आवाज उठवणे आवश्यक आहे.


Multi Language |Offline reading | PDF