तलावांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यावरून गुन्हा प्रविष्ट करा ! – राजस्थान उच्च न्यायालय

बंदी आदेशाचे उल्लंघन

जयपूर – न्यायालयाचा बंदी आदेश असतांनाही गुलाब सागर सह अन्य तलावांमध्ये अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जित केल्याच्या प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने मूर्ती विसर्जित करणार्‍यांना शोधून त्यांच्यावर भा.दं.वि. कलम २७७ अंतर्गत जलप्रदूषणाचा गुन्हा प्रविष्ट करण्याचा आदेश दिला आहे.  न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर हा आदेश न्यायालयाने दिला. यावर १८ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. १९ फेब्रुवारी २००७ मध्ये शहरातील तलाव प्रदूषणापासून वाचवण्यासाठी त्यामध्ये मूर्ती, तसेच अन्य साहित्यांचे विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली होती.


Multi Language |Offline reading | PDF