हावडा (बंगाल) येथील कमर अली यांच्या दुकानातून १४ बॉम्ब जप्त

धर्मांध आणि त्यांना पाठीशी घालणारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांमुळे पाकिस्तान होण्याच्या वाटेवर असलेला बंगाल !

चुकून हिंदूंच्या दुकानात असे बॉम्ब सापडले असते, तर हिंदूंना भगवे आतंकवादी, तालिबानी ठरवण्यासाठी एकजात निधर्मीवादी, पुरोगामी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे या बातमीवरून तुटून पडले असते ! आता मात्र तसे काहीच झालेले नाही आणि अल्प माध्यमांनी हे वृत्त प्रकाशित केले आहे !

कोलकाता : पोलिसांनी हावडा येथील एका दुकानातून १४ बॉम्ब जप्त केले आहेत. १३ सप्टेंबरला येथे झालेल्या एका स्फोटात दुकानाचा मालक कमर अली हा गंभीररित्या घायाळ झाला होता. त्यानंतर पोलिसांनी येथे झडती घेतली असता त्यांना हे बॉम्ब सापडले. तसेच बॉम्ब बनवण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले. (बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि एवढ्या मोठ्या संख्येने बॉम्ब कशासाठी दुकानात ठेवले होते, याचाही पोलिसांनी तपास केला पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF