सत्य इतिहास शिकवण्यासाठी उत्तरप्रदेशमधील शाळांचा अभ्यासक्रम पालटण्यात येणार ! – उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

आतापर्यंत भारतियांना खोटा इतिहास शिकवणार्‍या उत्तरदायींवरही कठोर कारवाई करा !

उत्तरप्रदेशप्रमाणे देशातील इतर राज्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना खरा इतिहास कधी शिकवणार ?

मोगल आपले पूर्वज नव्हते, तर ते लुटारू होते !

लक्ष्मणपुरी (लखनौ) – मोगल आपले पूर्वज नव्हते, तर ते लुटारू होते. त्यांनी आपला देश लुटला आहे. आमचे पूर्वज लुटारू असू शकत नाहीत. त्यामुळे आता शाळांमध्ये सत्य इतिहास शिकवण्यात येणार आहे. त्याकरता उत्तरप्रदेशमधील शाळांचा अभ्यासक्रम लवकरच पालटण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले आहे. काही मोगलांनी चांगले कामही केले आहे. त्यांचा उल्लेख इतिहासात नक्कीच केला जाईल, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

येथील ‘आज तक’च्या एका कार्यक्रमात शर्मा म्हणाले, ‘‘इतिहास विसरल्याने लोकांमध्ये विकृती निर्माण होेते. आमची संस्कृती विध्वंसक नव्हती. भारताच्या इतिहासात मोगलांची कोणतीच भूमिका नाही. उलट त्यांनी देशाची संपत्ती लुटण्याचे काम केले. उत्तरप्रदेश सरकार शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रम चालू करणार आहे. त्यावर प्रक्रिया चालू आहे. हा अभ्यासक्रम आधुनिक इतिहासावर आधारित असेल. मंगल पांडेने इंग्रजांच्या विरोधात क्रांती केली होती, तेव्हा बहाद्दूर शहा जाफर यांनी त्याचे समर्थन केले होते. अशांना आमचा विरोध नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF