(म्हणे) ‘देशाच्या सन्मानासाठी रोहिंग्या मुसलमानांना देशात स्थान द्यावे !’ – अबू आझमी

‘प्राण गेला, तरी ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, असे म्हणून देशाचा सन्मान धुळीस मिळवणार्‍या अबू आझमी यांनी असे म्हणणे लज्जास्पद आहे ! मुसलमान लोकप्रतिनिधी जगभरातील मुसलमानांचा (मग ते कोणत्याही वृत्तीचे असोत) प्रथम विचार करतात; मात्र किती हिंदु लोकप्रतिनिधी असा हिंदूंचा विचार करतात आणि त्यांच्या रक्षणासाठी आवाज उठवतात ?

मुंबई, १३ सप्टेंबर (वार्ता.) – मोदी शासन ‘भीकमंगे’ झाले आहे. यापूर्वी बांगलादेशमधील निर्वासितांना या देशात सामावून घेण्यात आले आहे. (बांगलादेशमधील निर्वासितांना शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि मतपेटीच्या गणितामुळे आश्रय मिळाला आहे. मोदी शासनाने ही संधी साधून बांगलादेशींनाही देशाबाहेर काढण्याची मोहीम राबवावी ! – संपादक) शासनाला कर हवा असेल, तर आम्ही पैसे गोळा करून शासनाला देण्यास सिद्ध आहोत. आज रोहिंग्या मुसलमानांना देशात सामावून न घेतल्याने जगात भारताची ‘छी-थू’ होत आहे. आम्हीही या देशाचे अंग आहोत. देशाच्या सन्मानासाठी रोहिंग्या मुसलमानांना देशात स्थान द्यावे, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे राज्याचे अध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनी केले. (‘आम्हाला देशातून घालवा; पण ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याची सक्ती करू नका’, असे विधान अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते, हे लक्षात घेऊन ‘सरकारने आझमी यांनाही रोहिंग्या मुसलमानांसमवेत देशाबाहेर घालवावे’, अशी मागणी राष्ट्रप्रेमी जनतेने केल्यास चूक ते काय ? – संपादक)

रोहिंग्या मुसलमानांना म्यानमार देशातून हाकलून लावण्यात आल्याच्या निषेधार्थ रोहिंग्या सॉलिडरिटी मुव्हमेन्ट, मुंबईच्या वतीने १३ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत ‘रोहिंग्या मुसलमानांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा’, ही मागणी करण्यात आली. या वेळी विविध इस्लामिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारमधून हाकलून लावल्यावर मानवतावादी दृष्टीकोनाची आठवण होणार्‍यांना ज्या वेळी काश्मिरी हिंदूंवर तेथील धर्मांधांनी अनन्वित अत्याचार करून त्यांना काश्मीरमधून पलायन करायला भाग पाडले, त्या वेळी मानवतावादी दृष्टीकोनाची आठवण झाली नाही का ? एका बाजूला ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारतातच आश्रय मागायचा, हा धर्मांधांचा कावेबाजपणा सरकारने लक्षात घ्यावा ! – संपादक)

या वेळी अबू आझमी म्हणाले, ‘‘सातत्याने इस्लामच्या विरोधात भूमिका मांडणार्‍या तस्लीमा नसरीन यांच्यासाठी केंद्र सरकारने पायघड्या घातल्या, त्याप्रमाणे रोहिंग्या मुसलमानांना संरक्षण देऊन भारताने मानवतावाद जोपासावा. (रोहिंग्या आतंकवाद्यांनी म्यानमारमध्ये अद्यापपर्यंत १०० हून अधिक हिंदूंच्या हत्या केल्या आहेत. असे आतंकवादी भारतात आले, तर भारतात किती हिंदूंच्या हत्या करतील, याची कल्पनाही करू शकत नाही ! – संपादक) सद्दाम हुसैन याने इराणमध्ये काही जणांना गोळ्या घातल्यावर अमेरिका त्याच्यावर आक्रमण करते; मात्र रोहिंग्या मुसलमानांवर एवढे अत्याचार होऊनही अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघ गप्प आहेत. बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्थान, सौदी अरेबिया, इंडोनेशिया या देशांमध्ये रोहिंग्या मुसलमानांना निवारा द्यावा.’’


Multi Language |Offline reading | PDF