प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नव्हे, तर मूर्तींवरील रासायनिक रंगामुळे जलप्रदूषण होते ! – वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे

प्रदूषणाचे कारण सांगून मूर्तीविसर्जनास विरोध करणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि धर्मद्रोही अंनिसवाले हे सत्य लक्षात घेतील का ?

कारखान्यांतून सोडण्यात येणारे दूषित रासायनिक पाणी यामुळे प्रदूषण होत असतांना आणि ते सांगण्यासाठी कोणत्याही तज्ञाची आवश्यकता नसतांना या विरोधात पर्यावरणवादी आंदोलन का करत नाहीत ?

नागपूर – प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे जलप्रदूषण होत नाही. मूर्तींवरील रासायनिक रंग पर्यावरणासाठी अधिक घातक आहेत. याउलट प्लास्टर ऑफ परिस (पीओपी) हे अल्प घातक आहे, असा दावा जलप्रदूषणासंबंधी संशोधन करणारे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. प्लास्टर ऑफ परिसच्या मूर्तींना पर्यावरणवाद्यांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. मोघे यांनी केलेले संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर खत म्हणूनही केला जातो. त्याचे अमोनिअम सल्फेटमध्ये रूपांतर करण्यासाठी अमोनिअम कार्बोनेटचा वापर करणे आवश्यक नाही. अमोनिअम कार्बोनेटचा वापर केल्यामुळे विषाक्त अमोनिआ, नायट्रेट आदींची निर्मिती होऊ शकते. श्री गणेशमूर्तींना लावण्यात येणार्‍या रंगांमध्ये लीड, अ‍ॅल्युमिनियम, झिंक हे विषारी रसायन असल्याने ते जलस्त्रोतासाठी अधिक घातक ठरतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील रंगाचा भाग वेगळा काढल्यास त्याचा वापर थेट खत म्हणून करता येतो. प्लास्टर ऑफ पॅरिस हे नैसर्गिक खनिज आहे, असे डॉ. मोघे यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF