मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती चेल्लूर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनाही धमकी देण्यात येते, तेथे सामान्य माणसाच्या जिवाचे मूल्य काय असणार ! ही दु:स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करते !

 

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांना बॉम्बस्फोटाद्वारे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर उच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे; परंतु तपासणीत बॉम्ब किंवा बॉम्बसदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही.

१. मुंबई पोलिसांच्या नियंत्रणकक्षात अज्ञाताने दूरभाष करून आलेल्या धमकीच्या दूरध्वनीत अज्ञाताने ‘मुख्य न्यायमूर्तींच्या चेंबरच्या बाजूच्या खोलीमध्ये बॉम्ब ठेवला असून थोड्याच वेळात स्फोट घडवला जाईल’, अशी धमकी दिली होती.

२. या धमकीनंतर उच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली.  शिवाय न्यायमूर्तींच्या दालनात बॉम्ब शोध पथक, श्‍वान पथक दाखल झाले. यानंतर दुसर्‍या मजल्यावरील मंजुळा चेल्लूर यांच्या कक्षासह शेजारील खोलीचीही पडताळणी केली; मात्र पडताळणीत काही सापडले नाही. ‘पूर्ण पडताळणीनंतर मंजुळा चेल्लूर यांना न्यायालयाच्या कक्षामध्ये पाठवले जाईल’, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

३. ही धमकी कोणी दिली, याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही; पण हा बनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Multi Language |Offline reading | PDF